इंदापूर तालुक्यात सर्वसामान्य शेतकरी उपाशी, पाणीचोर तुपाशी...

राजकुमार थोरात
रविवार, 13 मे 2018

पाण्याअभावी पिके जळाली आहेत. नीरा डाव्या कालव्यातून व वितरिकेमधून सायफनद्वारे होणाऱ्या बेसुमार पाणीचोरीमुळे सर्वसामान्य शेतकरी उपाशी राहिले आहेत.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यामध्ये पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकरी उपाशी तर पाणीचाेर तुपाशी अशी परिस्थिती झाली असुन पाण्याअभावी शेतकऱ्यांची चारा पिके जळून खाक झाली आहेत.

चालू वर्षी नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रामध्ये मुबलक पाणी साठी असल्याने नीरा डाव्या कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी मिळेल या अपेक्षेवरती चारा पिके व इतर पिकांच्या लागवडीचे नियोजन केले होते. मात्र इंदापूर तालुक्यातील पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी कालव्याचे पाण्याचे नियोजन केले नसल्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी पिके जळाली आहेत. नीरा डाव्या कालव्यातून व वितरिकेमधून सायफनद्वारे होणाऱ्या बेसुमार पाणीचोरीमुळे सर्वसामान्य शेतकरी उपाशी राहिले आहेत. धरणातून नीरा डाव्या कालव्यामध्ये १३ मार्च पाण्याच्या आवर्तनास सुरवात झाली होती. ६२ दिवस पाण्याचे आवर्तन सुरु असूनही उन्हाळी हंगामातील पाण्याचे अावर्तन संपले नाही. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्याच्या ५७, ५४  क्रमांकाच्या वितरिकेवरील अनेक शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पाण्याचे पहिले आवर्तन मिळाले नाही.या शेतकऱ्यांनी दुसऱ्या हंगामातील पाण्याचे आवर्तन सुरु झाल्यावरती पाणी देण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले असून पिके जळून राख झाल्यावरती पाण्याचा काय उपयोग होणार? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The farmers fodder crops faces issue because of lack of water