Tomato Rate : शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लाल चिखल; शेतकऱ्यांवर टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची आली वेळ

पुणे जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठेत टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.
tomato
tomatosakal
Updated on

चाकण - जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठेत टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात टोमॅटोला मंगळवारी (ता. ८) प्रतिकिलोला सहा ते दहा रुपये बाजारभाव मिळाला. यातून उत्पादनखर्चही मिळत नसल्याने उत्पादकांच्या चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रतिकिलोला ८० ते १०० रुपयांवर गेलेला टोमॅटोचा प्रतिकिलोचा बाजारभाव यावर्षी फक्त सहा ते दहा रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. शेतकऱ्यांवर टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची, तसेच बाजारात विक्री न झाल्याने फेकून देण्याची वेळ आली आहे. बाजारात टोमॅटो विक्रीविना पडून राहत आहे.

महात्मा फुले बाजारात टोमॅटो स्थानिक परिसरातून तसेच नगर, नाशिक, लातूर जिल्ह्यातून विक्रीसाठी येत आहे. सुमारे पन्नास टनावर टोमॅटोची मोठी आवक होत आहे. त्यात भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

टोमॅटोचे भाव घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही वसूल होत नाही. सरकारचे ही याकडे लक्ष नाही.

- विक्रम शिंदे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com