दुष्काळी इंदापूर तालुक्यातील शेतकरी पावसाने मेटाकुटीला

rain
rain

कळस (पुणे) :  इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी पावसाने मेटाकुटीला आला असून, काही महिन्यांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

इंदापूर तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे द्राक्ष बागांचा हंगाम वाया गेला असून, काढण्यात आलेली बाजरी व पेरणी केलेली ज्वारी या पिकांसह कांदा, तूर यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब पिकालाही मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

याबाबत कृषी विभागाच्या भिगवणचे मंडल अधिकारी बी. पी. कोकणी यांनी सांगितले की, भिगवण मंडळांतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची प्राथमिक आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला कळविली आहे. या भागातील द्राक्ष, कांदा व बाजरी पिकांचे सुमारे 375 हेक्‍टर क्षेत्र पावसामुळे बाधित झालेले आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त होताच पंचनामे करण्यास सुरुवात केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com