अरे वा, मुळशीतील शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या परिसरातील हवामानाचा अंदाज 

mulsh
mulsh

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्यात होणारा अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, ढगाळ हवामान यांचा अचूक अंदाज मिळावा, यासाठी स्वयंचलीत हवामान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आता या स्वयंचलित हवामान केंद्रांमार्फत अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हवामानातील बदलामुळे ऋतुमध्ये पूर्ण बदल झालेला आहे. कधी उन्हाळ्यात जोरदार पाऊस, तर कधी पावसाळ्यात कडक ऊन पडत आहे. मात्र, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना होतो. हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना गाव पातळीवरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची समिती त्यांना अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते. 


त्यामुळे शासनाच्या नवीन धोरणानुसार महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्राम विकास विभागाचे जागेसाठी सहकार्य घेऊन, स्कायमेट या संस्थेमार्फत शासनाने मुळशी तालुक्यात आठ स्वयंचलीत हवामान केंद्रांची स्थापना करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. 

मुळशी तालुक्यात या पूर्वी याच संस्थेमार्फत मुठा, माले, पौड, घोटावडे, पिरंगुट व थेरगाव या सहा ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. यात वाढ होऊन आता कासारआंबोली, आंबवणे, कोळवण, पोमगाव, दासवे, सूस, माण, सावरगाव या आठ ठिकाणी स्वयंचलीत हवामान केंद्र स्थापन होणार आहेत. त्यामुळे आता या स्वयंचलित हवामान केंद्रांमार्फत अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.


या केंद्राची संयुक्त पहाणी तहसीलदार अभय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी कुंडल हसरमनी, कृषी अधिकारी चंद्रशेखर जोशी, मंडल अधिकारी सुहास कांबळे, अनिल शेडगे, सुषमा कुलशेट्टी, कृषी विभागाचे सहायक कृषी अधिकारी अंकुश काळे, नितिन दुगाने, स्वप्नील कारंडे, नवनाथ देवकर, राजेंद्र गुंडाळकर, नीलेश जगताप, राजकुमार डोंगरे, श्री. बर्गे, गाव कामगार तलाठी नामदेव पासलकर, वाघमारे, श्रीमती. जमदाडे, तलाठी विवेक अवचारे, अभिषेक शेलार, संकेत आव्हाड, प्रतिमा वाघोले, ग्रामसेवक सुर्यकांत गायकवाड, बी. टी. यादव, श्री. जाधव व स्कायमेट या संस्थेमार्फत गणेश राजगुरू यांनी पूर्ण केली. 

असा घ्या हवामानाचा अंदाज                         आपल्या परिसरातील हवामानाचा अंदाज घ्यायचा असेल, तर प्ले स्टोअरमधून स्कायमेट वेदर हे अॅप डाउनलोड करावे. यात जवळचे केंद्र निवडल्यास हवामानाची सर्व माहिती मिळू शकते. शेतकऱ्यांनी याचा वापर करुन शेतीचे काम करावे, असे आवाहन कृषी अधिकारी चंद्रशेखर जोशी यांनी केले आहे. 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com