कीटकनाशकांची फवारणी करताना शेतक-यांनी काळजी घेणे अत्यावश्यक - डॉ. कीर्ती पवार

मिलिंद संगई
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बारामती शहर - कीटकनाशकांची फवारणी करताना शेतक-यांनी कमालीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती पवार यांनी केले.

बारामती शहर - कीटकनाशकांची फवारणी करताना शेतक-यांनी कमालीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती पवार यांनी केले.

 गेल्यावर्षी कीटकनाशक फवारणी यंत्रातील दोषामुळे श्वसनातून विषबाधा होऊन यवतमाळ मधील शेकडो शेतकरी अत्यवस्थ झाले होते तर काहींना प्राणालाही मुकावे लागले होते. या आपतकालिन स्थितीत शासकीय यंत्रणा व महाराष्ट्र आरोग्य सेवेने डॉ. कीर्ती पवार यांचा या विषयातील सखोल अभ्यास विचारात घेऊन त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते. यंदाही यवतमाळ येथे त्यांना फवारणी हंगाम सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनासाठी बोलाविण्यात आले होते, त्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले. 

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित एका चर्चासत्रात त्यांनी आपले विचार मांडले. कीटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यायला हवी या बाबत पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कीटकनाशकांच्या अति वापरामुळे कर्करोगाचे प्रमाणही वेगाने वाढू लागले आहे हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे, असेही त्या म्हणाल्या. कीटकनाशक फवारणी अथवा कीटकनाशके पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या रुग्णांचा जागतिक मृत्यूदर वीस टक्क्यांहून अधिक आहे, हा मृत्यूदर केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर शून्य टक्क्यांवर आणण्याचा कीर्ती पवार यांचा प्रयत्न आहे. 
गतवर्षी पवार यांच्या उपाययोजनांमुळे त्याचा फायदा झाला होता.

Web Title: Farmers need to take care of spraying pesticides - Dr. Kirti Pawar