गुंजवणी पाईप लाईनला शेतकऱ्यांचा विरोध

किरण भदे
Thursday, 26 November 2020

गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला नेताना ते धरणापासून डाव्या बाजुच्या डोंगराच्या पायथ्यापासून नेण्यात येणार होते त्या मुळे डोंगरा खालील नदी पर्यंत जमीनीला उताराने पाणी मिळणार होते परंतु या बंद पाईपलाईनचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनी च्या कर्मचार्यांनी पाईप लाईनच्या कामासाठी मोजमाप सुरू केले असुन ते गुंजवणी नदी च्या काठावरुन  शेतकऱ्यांच्या शेता मधून होत आहे

नसरापूर (पुणे) : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणातून पुरंदर तालुक्याला नेण्यात येत असलेल्या पाण्याच्या बंद पाईपलाईनची जागा बदलल्याने भोर-वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पाईपलाईनच्या कामास विरोध केलाअसुन बळीराजा शेतकरी संघाकडून या बाबत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस प्रशासन व पाटबंधारे विभागास निवेदन दिले. काम त्वरीत बंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला नेताना ते धरणापासून डाव्या बाजुच्या डोंगराच्या पायथ्यापासून नेण्यात येणार होते त्या मुळे डोंगरा खालील नदी पर्यंत जमीनीला उताराने पाणी मिळणार होते परंतु या बंद पाईपलाईनचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनी च्या कर्मचार्यांनी पाईप लाईनच्या कामासाठी मोजमाप सुरू केले असुन ते गुंजवणी नदी च्या काठावरुन  शेतकऱ्यांच्या शेता मधून होत आहे.  या बाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्र्वासात घेण्यात आलेले नाही पाईप लाईन नदी शेजारून गेल्यास शेतकऱ्यांच्या लिफ्ट योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना चे पाईप चे नुकसान होणार आहे तसेच पिकांचे देखिल नुकसान होणार आहे. तसेच खालुन डोंगराच्या पायथ्याशी पाणी पोहचणे शक्य नाही यामुळे शेतकरी यास विरोध करत आहेत.

हेही वाचा - Sakal Exclusive : मेट्रो खोदकामावेळी पुण्यात सापडले भल्यामोठ्या प्राण्यांचे अवशेष; हत्तीची हाडं असल्याचा निष्कर्ष

नसरापूर जवळील निधान सांगवी गावातील शेतकऱ्यांनी मोजमाप करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना यामुळे पिटाळून लावले आहे. बळीराजा शेतकरी संघा कडून याबाबत निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये खालुन जाणारी पाईप लाईन म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे हे काम होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.काम न थांबवल्यास त्याFarmers oppose Gunjawani pipelineसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संघाचे  जिल्हाध्यक्ष क्रुष्णा फडतरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष  यशवंत कदम, भोर तालुका अध्यक्ष काका शिळीमकर, जिल्हा सदस्य  गोरख धावले व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
या बाबत गुंजवणी प्रकल्पाचे अधिकारी व एल अँड टी कंपनी चे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पाईप लाईन नदी शेजारून गेली तरी दाबा मुळे पाणी डोंगराच्या पायथ्याशी जाणार आहे तसेच या कामा बाबत शेतकरी, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊनच काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

हेही वाचा - चोरट्यांनी ATM मशीन स्कॉर्पिओतून पळवलं; 5 मिनिटाची चोरी CCTV त कैद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers oppose Gunjawani pipeline