
मांजरी खुर्द : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नुकत्याच पंधरा नगर रचना योजना (टी.पी. स्कीम) प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील या योजनेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत हा विरोध केला.