esakal | VIDEO - सचिनच्या ट्विटवर शरद पवार यांची प्रतिक्रिया; सल्ला देत म्हणाले... 
sakal

बोलून बातमी शोधा

sachin tendulkar sharad pawar

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विटबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी सचिनला एक सल्ला दिला आहे.

VIDEO - सचिनच्या ट्विटवर शरद पवार यांची प्रतिक्रिया; सल्ला देत म्हणाले... 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आता भारतात दोन गट तयार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर भारतातील अनेक दिग्गजांनी ट्विटरवरून मोहिमच सुरु केली. या मोहिमेमुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी परदेशातील सेलिब्रिटींना सुनावलं आहे. यानंतर भारतातील कलाकार, क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

दरम्यान, सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विटबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी सचिनला एक सल्ला दिला आहे. शरद पवार यांना सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी वेगळी भूमिका घेतली असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

हे वाचा - कृषी कायद्याने काय मिळणार? शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे वाचा

शरद पवार म्हणाले की, त्यांनी काही भूमिका घेतली त्यावर सामान्य लोकांनी तीव्र मते व्यक्त केली. त्यामुळे आपले क्षेत्र सोडून बाकीच्या गोष्टी बोलताना काळजी घ्यावी हा माझा सल्ला सचिनला राहील असंही त्यांनी म्हटलं. 

सचिन तेंडुलकरने पॉप सिंगर रिहानाच्या ट्विटनंतर एक ट्विट केलं होतं.  शेतकरी आंदोलनावर हॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर भारतात अनेकांनी त्यांचं समर्थन केलं तर काहींनी हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे अशी भूमिका घेतली होती. त्यात सचिन तेंडुलकरनेसुद्धी तीच री ओढली होती. 

हे वाचा - बिग बींनी 5 वर्षांपूर्वी उडवली होती खिल्ली; रूटच्या द्विशतकानंतर आता फ्लिंटॉफचा रिप्लाय

सचिन म्हणाला होता की, 'भारतीय सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकत नाही. परदेशी लोक केवळ याकडे लक्ष देऊ शकतात, पण त्यांनी सहभागी होऊ नये. भारताला भारतीय चांगल्याप्रकारे ओळखतात. आणि भारताबाबतचा निर्णय भारतीय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजुटीने उभे राहूया.'