

Raju Shetti Announces Intensified Agitation for Farmers
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : “शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी गेल्या २५ वर्षांपासून रस्त्यावर उतरून लढा देत असून हा संघर्ष आता आणखी तीव्र केला जाणार आहे. कोल्हापूर व सांगली भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम जोरदार सुरू असून, यापुढील काळात पुणे जिल्ह्यातही अधिक ताकदीने संघटना उभी करून ऊसासह सर्व शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी निर्णायक लढा उभारण्यात येईल.” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.