उन्हाच्या चटक्यापासुन फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

राजकुमार थोरात
रविवार, 1 एप्रिल 2018

वालचंदनगर- ग्रामीण भागामध्ये उन्हाच्या पाऱ्याने चाळीसी गाठली आहे. उन्हाचा परिपक्व झालेल्या  फळबागांवरती परीणाम होत अाहे. हाततोंडाशी आलेली फळबागा उन्हापासुन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.

वालचंदनगर- ग्रामीण भागामध्ये उन्हाच्या पाऱ्याने चाळीसी गाठली आहे. उन्हाचा परिपक्व झालेल्या  फळबागांवरती परीणाम होत अाहे. हाततोंडाशी आलेली फळबागा उन्हापासुन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.

ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाऱ्याने चाळीसी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली पोपई, डाळिंबाची, केळी व अंतिम टप्यामध्ये असलेल्या द्राक्षांची पिके धोक्यात येवू लागली आहेत. उन्हामुळे सनबर्निंग होत असून पिकांना डाग पडत आहेत. तसेच उन्हाच्या चटक्यामुळे फळबागा खराब ही होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उन्हापासुन पिकांचे सरंक्षण व्हावे यासाठी पोपई,केळी,डाळिंबाच्या बागांना साड्याची झालर व अथवा प्लाॅस्टिकच्या कागदाने झाकण्यास सुरवात केली असुन पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
 
Web Title: farmers to save orchards from sunburn