शेतकऱ्यांना मिळणार आता बांधावरच खते

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आपापल्या गावातच रासायनिक खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
Fertilizer
FertilizerSakal

पुणे - कोरोनाच्या (Corona) पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना (Farmer) खरीप हंगामासाठी आपापल्या गावातच रासायनिक खते (Chemical Fertilizer) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला असून यानुसार एक्सेल सिटच्यामाध्यमातून गावनिहाय आॅनलाइन मागणी नोंदवून (Registration) घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अगदी शेताच्या बांधावरच खते उपलब्ध होऊ शकणार आहेत. (Farmers will now get fertilizer only on the Farm)

पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामासाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली असून पेरण्यांसाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. राज्य सरकारने खरिपासाठी २६ हजार १३४ क्विंटल बियाणे आणि १ लाख १८४ हजार ४८० मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. शिवाय रब्बी हंगामातील ८९ हजार ७६३ टन खते शिल्लक आहेत. यामुळे खरिपासाठी २ लाख ७४ हजार २४३ टन रासायनिक खते उपलब्ध झाले आहेत. यंदाच्या खरिपासाठी खते व बी-बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरिपासाठी खते व बियाणांची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी सांगितले.

Fertilizer
पुणेकरांना मोठा दिलासा; आज कोरोना रुग्णसंख्या तीन अंकी

जिल्ह्यात मागील तीन खरीप हंगामात दरवर्षी सरासरी २० हजार १९४ क्विंटल बियाणांची विक्री झाली होती. या सरासरी विक्रीच्या आधारे यंदाच्या खरीप हंगामासाठी आणखी ५ हजार ९४० क्विंटल बियाणांची वाढीव साठ्याची मागणी करण्यात आली होती. तो सरकारने मंजूर केला आहे. रासायनिक खतांच्या बाबतीतही हेच सूत्र अवलंबण्यात आले आहे. मागील खरीप हंगामात १ लाख ९५ हजार ३४६ टन रासायनिक खतांची विक्री झाली होती. त्यात यंदा आणखी ७८ हजार ८८९ टनांचा जास्तीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबीन, मका, बाजरी ही प्रमुख पिके घेतली जातात. जिल्ह्यात या पिकांच्या बियाणांसाठी मोठी मागणी असते.

यानुसार भात पिकाचे १२ हजार ६८८ क्विंटल, सोयाबीन- ६ हजार ७५० क्विंटल, मका - २ हजार २५० क्विंटल आणि बाजरीचे २ हजार २०० क्विंटल इतके मुबलक बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरम्यान, खरीप पिकांसाठी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली असून धूळवाफ पेरण्यांना सुरवात झाली आहे. याशिवाय भात पिकाच्या रोपवाटिकांची कामे सुरु झाली आहेत.

Fertilizer
पुण्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण रहाणार ठप्प

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील

शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरच खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी कृषी विभागाच्यावतीने गावनिहाय खतांची आॅनलाइन मागणी शेतकऱ्यांना घरबसल्या नोंदविण्याची सोय कृषी विभागाने केली आहे. या याद्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खते विक्रेत्यांकडे दिल्या जाणार आहेत.

- ज्ञानेश्‍वर बोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष

दरम्यान, सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरण्यांसाठी बियाणे किंवा खते खरेदी करण्यास अडचणी येऊ शकतात. या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आहे. कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास, शेतकऱ्यांनी या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी केले आहे. या कक्षाचा संपर्क क्रमांक (०२०) २५५३७७१८ आणि २५५३८३१० असा आहे. शिवाय dsaopune@gmail.com या इ-मेलच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com