ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

सध्या निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे परत एकदा पाऊस येतो की काय, या भीतीने पुणे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे. हवामानामुळे कांदा गहू यांसारख्या पिकांवर रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

माळशिरस (पुणे)  : सध्या निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे परत एकदा पाऊस येतो की काय, या भीतीने पुणे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे. हवामानामुळे कांदा गहू यांसारख्या पिकांवर रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

गणपतीपासून दिवाळीपर्यंत सतत चालू असलेल्या पावसाने मागील काही दिवसांत उघडीप दिल्यानंतर अद्याप शेत वाफसा होण्यास सुरुवात झाली होती. कांद्याच्या वाढलेल्या बाजार भावामुळे रोप उपलब्ध नसल्याने महागडे कांद्याची रोपे घेऊन शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. 

गव्हाच्या, ज्वारीचे पिके घेतली आहेत, मात्र कालपासून मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान तयार झाल्याने परत एकदा पाऊस येतो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगराई होण्याची भीतीदेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

मोठ्या प्रमाणावरती कांदा पिकावर सध्या खर्च करून खरिपाप्रमाणेच रब्बीतील ही पिकेदेखील वाया जातात की काय, अशी भीती त्यांना वाटू लागले आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीच्या सरकारच्या मदतीची शेतकरी प्रतीक्षा करीत असताना परत एकदा निसर्गाची ही आपत्ती ओढवते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers worried about cloudy weather!