राम नदीच्या रक्षणासाठी उपोषण

बावधन - राम नदीच्या रक्षणासाठी उपोषण करताना (डावीकडून) महेश पाटोळे, शांता सबनीस, शैलेंद्र पटेल, दिलीप वेडे-पाटील, इंदू गुप्ता, राजेंद्र वेडे-पाटील.
बावधन - राम नदीच्या रक्षणासाठी उपोषण करताना (डावीकडून) महेश पाटोळे, शांता सबनीस, शैलेंद्र पटेल, दिलीप वेडे-पाटील, इंदू गुप्ता, राजेंद्र वेडे-पाटील.

पौड रस्ता - गंगा नदीसह राम नदीच्या वाढत्या उपोषणाला आळा घालण्याच्या मागणीसाठी बावधनमधील राम नदीकाठावर असलेल्या विठ्ठल मंदिर येथे नागरिकांनी उपोषण केले. नदी जिवंत राहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

शैलेंद्र पटेल, शांता सबनीस, इंदु गुप्ता, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, राजेंद्र वेडेपाटील, महेश पाटोळे, उमेश गरड या वेळी उपस्थित होते. गंगा नदीचे प्रदूषण वाढल्याने स्वामी स्वानंदजी गेली अठरा वर्षे लढा देत आहेत. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत.

त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध नदी काठांवर एक दिवसीय उपोषण करण्यात आले.  जलदेवता सेवा अभियान अध्यक्ष शैलेंद्र पटेल म्हणाले, ‘बावधन एरिया सभेच्या वतीने एनजीटी (राष्ट्रीय हरीत लवाद) मध्ये लढा देत आहोत. नाला म्हणून जाहीर करण्यात आलेली राम नदी नदी असल्याचे आंदोलनाने सिद्ध करू शकलो. त्यामुळे अतिक्रमण थांबले.’ 

दिलीप वेडेपाटील म्हणाले, ‘जायका प्रकल्पामध्ये रामनदीचा समावेश केला जावा, यासाठी आम्ही महापालिकेत मागणी केली आहे. नदीवरील अतिक्रमणे हटवावीत म्हणून पाठपुरावा केला, त्याचा परिणाम म्हणून एका सोसायटीने नदीत बांधलेली भिंत पाडली. नदी पुन्हा पूर्वस्थितीत यावी हा आमचा प्रयत्न आहे.’ इंदु गुप्ता म्हणाल्या, ‘रामनदीचे पाणी पुन्हा पिण्यायोग्य व्हावे यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही राष्ट्रीय हरित लवादाकडे न्याय मागितला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com