
Two youths die in Ambegaon Taluka after their motorcycle fell into a deep pit, shocking the local community.
Sakal
-डी.के वळसे पाटील
मंचर : 'आकाशचा वाढदिवस साजरा करायचा, केक कापायचा, मित्रांसोबत जल्लोष करायचा'अशी तयारी सुरू होती. पण वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या ऐवजी गावावर शोककळा पसरली. आकाश वर श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील आकाश बाळासाहेब जाधव (वय २८) आणि मयूर संपत जाधव (वय २३) या दोन तरुणांचा मोटरसायकल खोल खड्ड्यात कोसळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ,(ता.13) रात्रीउशिरा घडली.