Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Maharashtra highway accident rickshaw driver dies on spot: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर वेन्यू कार, रिक्षा व आर्टिगाची समोरासमोर धडक; रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
Ghodegaon Accident: Rickshaw Driver Dies After Severe Head-On Impact

Ghodegaon Accident: Rickshaw Driver Dies After Severe Head-On Impact

esakal

Updated on

घोडेगाव : भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडी जवळ पिंपळगाव घोडे व शिंदेवाडी च्या दरम्यान चार चाकी वेन्यू मोटर (एम एच 14 जे एक्स ५००२) व तीन चाकी रिक्षा (एम एच 17 ए जे 12 82) यांच्यात समोरा समोर झालेल्या अपघातात रिक्षा चालक किशोर रामचंद्र नवले (वय 54 वर्ष ) हे ठार झाले. अपघात इतका मोठा होता की रिक्षाचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून रिक्षाच्या मागील असणाऱ्या आर्टिका गाडीलाही या चार चाकी गाडी धडक दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com