esakal | उलट्या काळजाचा बाप; जन्मदात्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच केलं पाप
sakal

बोलून बातमी शोधा

The father abused the his Own minor daughter in pune

नराधमाने बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारे  कृत्य केले. स्वतःच्या पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे गावात संतापाची लाट निर्माण झाली.

उलट्या काळजाचा बाप; जन्मदात्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच केलं पाप

sakal_logo
By
संतोष काळे

राहू (पुणे) : जन्मदात्या नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव बांडे (ता. दौंड) हद्दीत शुक्रवार (ता. 19) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर या घडनेचा तीव्र निषेध करीत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नराधम बापाला यवत पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. नराधमाने बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारे  कृत्य केले. स्वतःच्या पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे गावात संतापाची लाट निर्माण झाली.

आणखी वाचा - पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार
 

याबाबत पीडित मुलीच्या आईने यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी त्या नराधमाला नराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून यवत पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे अधिक तपास करत आहे. 

'आमचं ज्ञान कमी असेल'; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

loading image