पोलिसांच्या तप्तरतेमुळे मुलगी वडिलांकडे सुखरूप 

PNE18O44111.jpg
PNE18O44111.jpg

भिगवण : येथील आठवडे बाजार परिसरामध्ये सायकलवर फिरणारी नऊवर्षीय मुलगी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आली. सितू ओमप्रकाश मिश्रा (वय 9) ही मुलगी येथील आठवडे बाजार परिसरामध्ये सायकलवर फिरत असल्याचे आढळून आले. मुलीची अवस्था पाहून अमोल जालिंदर बनसोडे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे व किरण कदम यांनी तातडीने बाजारतळाजवळ येत मुलीकडे विचारणा केली. मुलीने केवळ आई-वडिलांचे नाव सांगितले; परंतु येथील पत्ता सांगता येत नव्हता.

मुलीने तिचे मूळ गाव असलेल्या गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील पत्ता सांगितल्यानंतर भिगवण पोलिसांनी गोरखपूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. गोरखपूर येथील नातेवाइकांकडून मुलीचे वडील दोन दिवसांपूर्वीच कुरकुंभ येथे कामानिमित्त आल्याचे समजले. त्यानंतर मुलीचे वडील ओमप्रकाश मिश्रा यांचा मोबाईल क्रमांक मिळवत त्यांच्याशी संपर्क साधला व भिगवण पोलिस ठाण्यामध्ये बोलावून मुलगी सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आली. अमोल बनसोडे यांनी दाखविलेली सतर्कता व भिगवण पोलिसांनी दाखविलेल्या तप्तरतेमुळेच आई-वडिलांपासून दुरावलेली लहान मुलगी सुखरूप घरी परतली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com