FCPooja : सत्यनारायण पुजेला एनएसयुआयचा विरोध नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे : ''फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो सत्यनारायणच्या पूजेचा प्रकार घडला. त्याला महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय कुठल्याही प्रकारे विरोध करणार नाही. एनएसयुआय ही काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असून, काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे. तीच विचारधारा एनएसयुआयची सुद्धा आहे.'' असे मत महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय अध्यक्ष अमीर शेख यांनी व्यक्त केले. 

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा सांगणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रकार गुरुवारी झाला. शैक्षणिक संस्थेत झालेल्या कर्मकांडाच्या या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण चांगलेच तापले. फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रवेश विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सत्यनारायण पूजा केली. शैक्षणिक संस्थेच्या आवारात अशा पद्धतीची पूजा घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत काही संघटनांनी याला विरोध केला. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

शेख म्हणाले, आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. कारण सर्वांना आपल्या धर्माचा पालन करण्याचा हक्क लोकशाहीने आपल्याला दिला आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाच्या पूजेचं नियोजन प्राध्यपकांनी केले होते. काही संघटनानी याचा विरोध केला. परंतु एनएसयुआय या विषयावर कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही. शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक रंग देऊ नये असा जरी शासनाचा अहवाल असला तरी त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक, धार्मिक व शारीरिक नुकसान होऊ नये हे मूळ उद्देश आपण लक्षात घायला हवे. मी सुद्धा दस्तूर शाळेमध्ये असताना रमजान महिन्यामध्ये नमाज पढायचो, म्हणून आमची शाळा धार्मिक रंग द्यायची असा बोलता येणार नाही

Web Title: FCPooja: NSUI does not oppose Satyanarayan Pujya