

Tukaram Mundhe
esakal
पुणे, ता. १९ : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळ व अस्वच्छतेबाबत पुण्यासह विभागातील इतर जिल्ह्यांत कारवाई केली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील चार प्रमुख हॉटेल व रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले असून, सुमारे एक लाख ७२ हजार रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. ‘एफडीए’ने नियमांची पायमल्ली करणाऱ्या अन्न पदार्थ व्यावसायिकांवर (हॉटेल, बेकरी, रेस्टॉरंट) कारवाई सुरू केली आहे.