येवले, साईबा चहावर ‘एफडीए’ची कारवाई

येवले, साईबा चहावर ‘एफडीए’ची कारवाई

पुणे - विनापरवाना चहाविक्री करणाऱ्या येवले आणि साईबा अमृततुल्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. बुधवार पेठ येथील येवले अमृततुल्यची शाखा, तर साईबा अमृततुल्यच्या नाना पेठ, धनकवडी आणि भारती विद्यापीठ शाखांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. 

शहरातील अमृततुल्य आणि चहाविक्री करणाऱ्यांची तपासणी मोहीम ‘एफडीए’च्या पुणे विभागाने हाती घेतली आहे. शहरात अन्नविक्री परवाना नसताना किंवा त्याची नोंदणीदेखील न केलेल्या अमृततुल्य, चहा विक्रेत्यांवर कारवाई केली. ते म्हणाले, ‘‘अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ कायद्यांतर्गत जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई केली आहे.’’ ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी, इम्रान हवालदार आणि सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.  याबाबत येवले अमृततुल्यचे संस्थापक नवनाथ येवले म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये ही कारवाई झाली होती. त्यानंतर हा परवाना काढला आहे.’’ साईबा अमृततुल्यचे संचालक मंगेश कल्याणकर म्हणाले, ‘‘आम्ही अन्न परवान्याची नोंदणी केलेली आहे; पण ती बारा लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नासाठी होती. यासाठी बारा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचा परवाना त्यानंतर आम्ही काढला आहे. ’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com