गार्डन वडापावला विक्री थांबविण्याचे आदेश !

FDA orders to stop sales Vadapaav to garden vadapaav centre
FDA orders to stop sales Vadapaav to garden vadapaav centre

पुणे : प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) धडक कारवाई करत व्यवसाय बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. 

पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सोमवारी रात्री धडक कारवाई करण्यात आली. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या वापरामुळे एफडीएने ही कारवाई केली आहे. जनहित व जनआरोग्याच्या कारणास्तव विक्रीचा व्यवसाय तातडीने बंद करण्याबाबत आदेश दिल्याचे एफडीएतर्फे सांगण्यात आले आहे.

कॅम्प परिसरातील अख्तर केटरर्स व बागवान हॉटेलवरही एफडीएकडून कारवाई करण्यात आली. शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल, केटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर एफडीएने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गार्डन वडापावच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभाव तसेच किडक्या बटाट्याचा वापर अशा कारणांचा समावेश आहे.

अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत तरतुदीनुसार बंधनकारक आहे. या कायद्यात सांगितलेल्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. 

ही कारवाई सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त संजय शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com