

FDA Action In Lonavala Hotels
ESakal
पुणे : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच स्वच्छता न ठेवणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंटवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एफडीएच्या पथकाकडून 'Safe Food Safe Maharashtra' विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील प्रमुख हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत लोणावळ्यातील चार नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.