Pune FDA Action : पुणे, कोल्हापूरसह 'या' 5 जिल्ह्यांत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! 2 लाख किलोहून अधिक भेसळयुक्त मिठाई अन् तूप जप्त; 111 दुकानांचे परवाने रद्द

FDA Suspends 111 Food Business Licences in Pune Division : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात एफडीएने विशेष तपासणी मोहीम राबवून १११ खाद्य व्यावसायिकांचे परवाने तात्पुरते रद्द केले. २.३१ लाख किलो खाद्यपदार्थांचा ६.८६ कोटींचा साठा जप्त केला.
Maharashtra FDA Raid 2.31 Lakh Kg Food Seized

Maharashtra FDA Raid 2.31 Lakh Kg Food Seized

esakal

Updated on: 

पिंपरी : दिवाळीच्या सणात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत, तसेच भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीस ठेवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत संशयास्पद व्यवहारांप्रकरणी १११ खाद्य व्यावसायिकांचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले. तसेच, दोन लाख ३१ हजार किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, सुमारे सहा कोटी ८६ लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला (Rs 6.86 crore food products seized in Pune) आहे.

Loading content, please wait...