Gaur Animal : आंदगावला गवा ग्रामस्थांमध्ये भिती

आंदगाव ( ता. मुळशी ) येथे शिवारात ग्रामस्थांना गवा दिसला आहे. तसेच तो वस्त्या, वाड्यांजवळ फिरत असतो त्यामुळे ग्रामस्थांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले
Gaur Animal
Gaur Animalsakal

भुकूम : आंदगाव ( ता. मुळशी ) येथे शिवारात ग्रामस्थांना गवा दिसला आहे. तसेच तो वस्त्या, वाड्यांजवळ फिरत असतो त्यामुळे ग्रामस्थांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्याचे बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच प्रफ्फुल मारणे यांनी वनविभागाकडे केली आहे.

याबाबत नागेश मारणे व मधुकर गायकवाड यांनी सांगितले की शनिवारी रात्री गवा येथील परिटवाडा, विठोबाचा वाड्याकड्याकडून टेकडीवर वसलेल्या शिंदेवाडीकडे गवा जाताना पाहिला. मुठा खोरेत यापूर्वी गवा आला होता. दरम्यान एकच गवा आहे की कळप ते अद्याप कोणी पाहिला नाही. मुठा खोरेला कोकण भाग जवळ आहे.

त्यामुळे गवा त्यामार्गे आला असावा असा संशय विठ्ठल गुजर यांनी व्यक्त केला. दरम्यान आंदगावला गुजरवाडी, गणेशवाडी, शिंदेवाडी, लोहारवाडी, आटाळवाडी टेकडूयांवर वसलेली आहेत. तसेच गावठाण व काही शेतकरींनी रानात घरे बांधलेली आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ गव्याच्या आगमानाने भयभीत झाले आहेत.

दरम्यान मुठा खोरेत गेल्यावर्षी गवा आढळला होता. येथील भोडे, वातुंडे, वांजळे, माळेगाव, कोंढूर मार्गे पुण्याकडे आला होता. त्यावेळी पुणे शहराजवळ गवा आल्याची चर्चा झाली होती. मुठा खोरे डोंगर उतारावर वसलेले असून तळाशी मुठा नदी आहे. गेल्या दोन वर्षा पासून याच दिवसात येथे गव्याचे आगमन होत आहे.

पिके, भाजीपाला व फळझाडांचे त्याने गेल्या वर्षी नुकसान केले होते. यादिवसात येथील शेतकरी भात झोडणी, रब्बी हंगामातील पेरणी, आंब्याच्या बागांचे संरक्षण यासाठी रात्रंदिवस शिवारात असतात. त्यामुळे मानवी जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांची गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com