esakal | आयटी कंपन्यांमुळे सोसायट्यांत कोरोनाची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

आयटी कंपन्यांमुळे सोसायट्यांत कोरोनाची भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. यामुळे अनेक कर्मचारी हे ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. मात्र, अजूनही काही कंपन्यांची कार्यालये रहिवासी इमारतींमध्ये सुरूच आहेत. त्यामुळे पुणे शहरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आपल्या कुटुंबाला संसर्ग होण्याची भीती बाणेर बालेवाडीमधील सोसायट्यांमधील नागरिकांना वाटत आहे. काही आयटी कंपन्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे

बाणेर बालेवाडी भागात अनेक आयटी कंपनी आहेत. आयटी क्षेत्रात काम करणारे बहुसंख्य कर्मचारी या भागांमध्ये राहतात. फेब्रुवारी महिन्यापासूनच येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अनेक सोसायट्यांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, तर काही सोसायट्यांमधील नागरिकांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश निषिद्ध केला आहे, अशी परिस्थिती असताना अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलविले जात आहे.

हेही वाचा: कधी थांबणार हे! सख्या भावांनी पाठोपाठ गमावला जीव

या भागात काही कंपन्यांची कार्यालये ही निवासी सोसायट्यांमध्ये असून ती अजूनही सुरू आहेत. या ठिकाणी पुण्यातील विविध भागातून लोक येत असल्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणार कसा? असा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अशा गंभीर परिस्थितीतही काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावर बोलावल्याचा दुराग्रह केला जात आहे. त्यामुळे येथे येणारे कर्मचारी व ज्या सोसायटीमध्ये अशा कंपन्या आहेत तिथल्या रहिवाशांना असुरक्षित वाटत आहे.

आम्हाला कामासाठी रोज ऑफिसला जावेच लागते. घरात लहान मुले आहेत, आई वडील आहेत. त्यांना आपल्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाटतो. त्यामुळे घरी गेल्यावर मी वेगळ्या खोलीमध्ये राहतो. कुटुंबाबरोबर राहूनही कुटुंबात न राहिल्याने एकाकीपणाची भावना निर्माण होते.

- एक आयटी कर्मचारी

loading image