फेडरेशन आॅफ घरकुलचे नामकरणाविरोधात आंदोलन

चिखली - घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’या नामकरण प्रस्तावास विरोध करण्यासाठी रविवारी धरणे आंदोलन करताना रहिवासी.
चिखली - घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’या नामकरण प्रस्तावास विरोध करण्यासाठी रविवारी धरणे आंदोलन करताना रहिवासी.

पिंपरी - महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ असे नामकरण करण्याच्याविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलने रविवारी (ता. २०) घरकुलच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन व उपोषण केले. या प्रकल्पाचे ‘घरकूल नवनगर संकुल’ असे नामकरण करण्याची मागणी फेडरेशनने या वेळी केली. 

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत ‘घरकूल’ प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात १६० इमारती मिळून सहा हजार ७२० सदनिका बांधण्यात येणार आहेत. आतापर्यंत १२४ इमारतींची उभारणी झाली आहे. त्यातील पाच हजार २०८ सदनिकांचे वाटप केलेले असून, लाभार्थी राहायलाही आलेले आहेत. उर्वरित सदनिकांचे काम सुरू आहे. ‘घरकुल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे नामकरण ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ करण्याचा प्रस्ताव आहे. त्याला विरोध करण्यासाठी घरकुलमधील नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वारावर मंडप उभारून रविवारी दिवसभर धरणे आंदोलन व उपोषण केले. लाकडी वासे लावून मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू (इन-आउट) रहदारीसाठी बंद केल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. 

फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष सुधाकर धुरी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राष्ट्रगीत व राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून आंदोलनाला सुरवात झाली. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com