पथनाट्यातून अवयवदान प्रबोधन

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 5 जुलै 2018

मांजरी : हडपसर मेडिकल असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ कन्स्लटंट यांच्यावतीने राष्ट्रीय डॉक्टर दिनी रॅली काढून तसेच ठिकठिकाणी पथनाट्य सादर करुन अवयवदानाबाबत जनजागृती केली. सर्व वैद्यकीय शाखांचे सदस्य  तसेच विविध रुग्णालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. जागोजागी सामान्य लोकांनी अवयवदाना विषयी माहिती घेतली.

अवयवदानाबद्दल समाजातील गैरसमज व भिती दूर व्हावी त्यासाठी अवयवदान ही संकल्पना घेऊन काढलेल्या या प्रबोधन फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. अजय माने लिखित आणि त्यांची कन्या समृद्धी माने दिग्दर्शित "अनादी अनंत'' या संहितेवर आधारित हे पथनाट्य डॉ. लोहिया उद्यान, अमनोरा टाऊनशिप व मगरपट्ट्यातील सिझन्स मॉलमध्ये सादर करण्यात आला.  

डॉ. रसिक गांधी, डॉ. वैभव वनारसे, 
डॉ. भरत बोरा, डॉ. अशोक जैन, डॉ. इलियास मोमीन, डॉ. हिमांशू पेंडसे, डॉ. नितीन शिंदे, डॉ. चेतन चव्हाण, डॉ. गणेश शिंदे, डॉ. अनिता गवळी, डॉ. मानसी कुलकर्णी, डॉ. शिवांजली आटपाडकर, डॉ. निलम बनसोडे, डॉ. उज्ज्वला यादव, डॉ. आरती आंभोरे, डॉ. अर्चना शेळके, डॉ. सारिका रेवडकर, डॉ. शीतल महाजन, डॉ. किर्ती माने या डॉक्टर कलाकारांनी सादरीकरण केले. त्यानंतर अनेक नागरिकांनी अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त करून अवयवदान प्रक्रिया समजून घेतली. 

मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, सचिव डॉ. सचिन अबणे, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी तसेच असोसिएशन ऑफ कन्स्लटंटचे अध्यक्ष डॉ. दिलीप माने सचिव डॉ. अनुराधा जाधव, सहसचिव डॉ. चेतन म्हस्के, कोषाध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी संयोजन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feeding organisms from street play