संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मे 2019

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे जणांऐवजी केवळ १९ जणांकडून अध्यक्ष निवडला जात असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ठाले-पाटील यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ठाले पाटील म्हणाले, ‘‘लोकशाही प्रक्रियेत एखाद्या निर्णयाच्या बाजूने बहुमत असताना अल्पमताला काही किंमत नसते. त्यामुळे नव्या प्रक्रियेत तूर्तास तरी बदल होणे शक्‍य नाही. साहित्य महामंडळाला लोकशाहीची चौकट आहे. अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया बहुमताने बदलल्यामुळे त्यातील गुण-दोष पाहावे लागतील; परंतु त्यामध्ये बदल होणे आता तरी शक्‍य नाही. संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला या प्रक्रियेचे समर्थन करावे लागेल.’’ अध्यक्षपदाची प्रक्रिया बदलणे, साहित्य महामंडळाने स्वतंत्र संस्था म्हणून वावरणे, संमेलनाव्यतिरिक्त इतर उपक्रम आयोजित करणे, सरकारकडे सतत निधीची मागणी करणे, या साहित्य महामंडळाने नागपूरला असताना राबविलेल्या धोरणांवर ठाले-पाटील यांनी टीका केली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल ठाले-पाटील यांचा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे,  कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feel free to convene the election process Thale-Patil expressed on Friday