दृष्टिहिन विद्यार्थ्यांचा सत्कार

संदिप जगदाळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

हडपसर : गायन व  संगित हे दृष्टिहिनांसाठी श्वास आहे. त्यामुळे दृष्टिहिन विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच संगीत व गायनामध्ये प्रगती करावी. पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे संगित व वादन शिकवले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आपले नाव कमवले आहे. तसेच चरितार्थाचे साधन म्हणून विदयार्थ्यांना या कलेचा वापर झाला आहे, असे मत संगित विशारद व संगित शिक्षक गौतम कांबळे बोलत होते. 

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील शाळेतील संगित समिती बक्षिस वितरण कार्यक्रम व कांबळे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाप्रसंगी कांबळे बोलत होते. याप्रसंगी पुणे अंधशाळेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, संगित शिक्षक नारयण चिंचवडे, कमल कांबळे, संगिता माटे, रामेश्र्वर खिळे, राजाराम जगताप, भारती चोभारकर, मनिषा शेवाळे, गणेश पाटील, राजेंद्र सुतार, रंगनाथ गजरे, संतोष जगताप, दामोदर सरगम, रेखा राउत, अमृत लोखंड, हुमा शहा उपस्थित होते. 

याप्रसंगी भोसले म्हणाले, शाळेतील संगित समितीच्या माध्यमातून वर्षभरात अनेक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळते. संगित व वादनामध्ये विद्यार्थ्यांना गती मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून समिती कार्यरत असून विदयार्थी व शिक्षक मिळून या संगित समितीचे कार्यक्रम करतात. तसेच संगित समितीच्यावतीने घेण्यात येणा-या संगित स्पर्धेमुळे विदयार्थ्यांना बक्षिसे मिळाल्यावर त्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.

Web Title: felicitation of blinds