पुणे : कर्मचाऱ्याकडून 1900 रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महिला लिपीकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे बिल काढण्यासाठी एक हजार 900 रुपयांची लाच स्विकारणाऱ्या शहरातील एका नामांकीत महाविद्यालयाच्या वरिष्ठ महिला लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तिच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे बिल काढण्यासाठी एक हजार 900 रुपयांची लाच स्विकारणाऱ्या शहरातील एका नामांकीत महाविद्यालयाच्या वरिष्ठ महिला लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तिच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निता सतिश गंगावणे (वय 47) असे लाच स्विकारणाऱ्या महिलेचे नाव आहे. महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गंगावणे या वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. तर तक्रारदार हे संबंधीत संस्थेमध्ये कर्मचारी आहेत.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

तक्रारदार यांनी संबंधीत महिलेकडे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे बिल काढून देण्यासाठी व सेवापुस्तिकेवर लेखापरीक्षकाची सही व शिक्का देण्यासाठी तिने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तक्रारदारास लाच देणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी सापळा लावून महिलेस अटक केली. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली, अशी माहिती विभागाचे पोलिस उपअधिक्षक श्रीहरी पाटील यांनी दिली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female clerk arrested for accepting bribe of Rs 1900 from employee in Pune