Hadapsar News : सासवड रस्त्यावर अढळले स्त्री जातीचे अर्भक

एकीकडे मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच त्याच्या पूर्वरात्री सासवड रस्त्यावर वीस ते पंचवीस दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक अढळून आले आहे.
Female infant found
Female infant foundsakal

हडपसर - एकीकडे मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच त्याच्या पूर्वरात्री सासवड रस्त्यावर वीस ते पंचवीस दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक अढळून आले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून बाळाच्या आईचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गाडीतळ उत्कर्ष नगर येथील फुटपाथवरील झाडाखाली एक बाळ रडत असल्याचे पादचारी महिला संध्या ओसवाल दिसले. तीने आवाज देवून मोठ्याने हे बाळ कुणाचे आहे, असे विचारले. मात्र, बराचवेळ जाऊनही तेथे कोणीच आले नाही. त्यामुळे संबधीत महिलेने हडपसर पोलिसांना त्याबाबत माहिती दिली.

पोलिसठाण्यातील महिला पोलिसांनी तातडीने धाव घेऊन सदर बाळाला पोलिस ठाण्यात आणले. सध्या बाळाला काळजीपोटी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. बाळाची आई कोण आहे, बाळाला पादचारी मार्गावर कोण ठेवून गेले, याचा आम्ही शोध घेत आहोत. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक हसन मुलानी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com