Ferguson collage : इंग्रज ध्वज उतरला, गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या; ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार फर्ग्युसन कॉलेज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ferguson collage

Fergusson College : इंग्रज ध्वज उतरला, गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या; ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार फर्ग्युसन कॉलेज!

विद्येची नगरी ही सध्या शिक्षण देण्यासोबतच तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधीही उपलब्ध करून देत आहे. पुणे हे शिक्षणाचेच नाही तर आयही हबसाठीही ओळखले जाते. याच पुण्यात असलेले एक कॉलेज ब्रिटीश काळापासून सुरू आहे. ब्रिटीश काळापासून असलेले हे कॉलेज अनेक मान्यवर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. या कॉलेजचा आज स्थापना दिन आहे. त्यानिमित्तानेच आज जाणून घेऊयात काही खास गोष्टी.

1882 ला आलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना वामन शिवराम आपटे यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन करून नव्या खासगी आर्टस् कॉलेजची गरज असल्याचे नमूद केले होते. त्यांच्या या मागणीवरून 2 जानेवारी 1885 रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली.

हेही वाचा: Share Market Today: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजार तेजीत; 'या' शेअर्समध्ये तेजी

न्यू इंग्लिश स्कूलसाठी ‘जेम्स फर्ग्युसन’ या तत्कालीन मुंबईच्या गव्हर्नरने या प्रस्तावाला अनुमोदन दिले व बक्षिसासाठी रुपये एक हजार दोनशे पन्नासची मदत देण्यापासून शक्य ते इतर सहकार्यही केले. याच अधिकाऱ्याच्या नावावरून कॉलेजचे नाव ‘फर्ग्युसन’ असे ठेवण्यात आले. 24 ऑक्टोबर 1884 रोजी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना झाली.

हेही वाचा: Delhi crime :''आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते'',मृत्यू झालेल्या तरुणीचे शब्द ठरले अखेरचे

संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कुंटे, तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता.

फर्ग्युसन कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. या महाविद्यालयातून घडलेले विद्यार्थी पुढे सैन्य, प्रशासन, राजकारण, खेळ, अभिनय अशा विविध क्षेत्रांत गेले. त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे. 

हेही वाचा: LIVE Update : 2016 च्या नोट बंदीवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता

ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार

या कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या वासुदेव बळवंत गोगटे यांनी 1931 मध्ये एका ब्रिटीश गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या. सोलापुरात केवळ मार्शल लॉचे उल्लंघन केले म्हणून इंग्रज सरकारने १६ निर्दोष लोकांना फासावर चढवले होते. या घटनेने वासुदेव बळवंत गोगटे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्यांनी या घटनेचा बदला म्हणून कॉलेज व्हिजीटला आलेल्या ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

हेही वाचा: Curd And Raisins Benefits : दही आणि मणूके एकत्र खाण्याचे भरमसाठ फायदे; एकदा खाऊन बघाच!

अशा या ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या अॅम्फी थिएटरमध्ये १९२७ साली देशातली पहिली भारतीय महिला परिषद झाली. सरोजिनी नायडू, यशवंतराव चव्हाणांची भाषणे येथे झाली. मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांचे ‘स्वातंत्र्य’ या विषयावर व्याख्यान येथे झाले होते.

1935 मध्ये कॉलेजमध्ये इंग्रज ध्वज उतरून भारताचा तिरंगा फडकवण्यात आला होता. तिथल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणाऱ्या सभागृहातील व्यासपीठाच्या एका बाजूस ब्रिटिश ध्वज ठेवण्यात आलेला होता. हा प्रकार तेथील विद्यार्थ्यांना आवडलेला नव्हता. तेथील विद्यार्थ्यांनी तो ध्वज काढून खाली ठेवून व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंस भारताचा ध्वज फडकवला होता.

हेही वाचा: Saurabh Rao : उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देण्याचा प्रयत्न; सौरभ राव

फर्ग्युसनची इमारत हा वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, पी. व्ही. नरसिंहराव असे अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडलेले अमुल्य मोती आहेत.