
Share Market Today: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजार तेजीत; 'या' शेअर्समध्ये तेजी
Share Market : नवीन वर्षाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली आहे. शेअर बाजार तेजीत सुरु झाला आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही ठिकाणी व्यवहार तेजीत दिसत आहे. सेन्सेक्स 60,800 च्या पुढे तर निफ्टी 18100 च्या पुढे खुला आहे.(Share Market Today)
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 13 समभागांमध्ये वाढ होत आहे आणि 17 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टी 26 अंकांच्या वेगाने व्यवहार करत असून 23 समभागांमध्ये घसरण नोंदवली जात आहे.

BSE India
आज शेअर बाजार उघडताना बीएसई सेन्सेक्स 30.50 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 60,871.24 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टी 26.40 अंकांच्या म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 18,131.70 वर उघडला आहे.
निफ्टीच्या आज बँक, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, धातू समभागांमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय हेल्थकेअर आणि फार्मा निर्देशांक 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
निफ्टीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या समभागांबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा स्टील, हिंदाल्को, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, ब्रिटानिया या कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दिसून येत आहे.
सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, एसबीआय, रिलायन्स, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एचयूएल, अॅक्सिस बँक आणि नेस्ले यांचा फायदा होत आहे.
हेही वाचा: नववर्षात आर्थिक नियोजनाची ‘लिटमस टेस्ट’
आज एसबीआय लाईफ (SBILIFE), आयशर मोटर्स (EICHERMOT), ग्रासिम (GRASIM), आयसीआयसीआय बँक (ICICIBANK), भारती एअरटेल (BHARTIARTL), ए यू बँक (AUBANK), टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR), झिंदाल स्टील (JINDALSTEL), पेज इंडिया (PAGEIND), अशोक लेलँड (ASHOKLEY) हे शेअर्स तेजीत असतील.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.