फर्ग्युसन महाविद्यालय आता होणार फर्ग्युसन विद्यापीठ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय या स्वायत्त संस्थेचे रुपांतर आता फर्ग्युसन विद्यापीठात करण्यात येणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडाळाने मान्यता दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न असलेले फर्ग्युसन महाविद्यालय आता स्वतंत्र विद्यापीठ म्हणून लवकरच अस्तित्वात येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे- पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय या स्वायत्त संस्थेचे रुपांतर आता फर्ग्युसन विद्यापीठात करण्यात येणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडाळाने मान्यता दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न असलेले फर्ग्युसन महाविद्यालय आता स्वतंत्र विद्यापीठ म्हणून लवकरच अस्तित्वात येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 100 कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यासही मंत्रिमंडळाने यावेळी मंजुरी दिली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णयही घेतला.

त्याचबरोबर, मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. वरील सर्व निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Web Title: fergusson college will now be held in fergusson University