Video : स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार इंटरनॅशनल फेस्टिव्हल!

PCMC
PCMC

पिंपरी : 'स्मार्ट सिटी' अंतर्गत शहर परिवर्तन कार्यालयामार्फत महापालिका 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पिंपरी-चिंचवड 'फेस्टिवल ऑफ द फ्युचर' उपक्रम राबविणार आहे. यामध्ये हॅकेथॉन, पीचफेस्ट, नवउद्योजकांच्या संकल्पनांचे प्रदर्शन आणि नामवंतांचे मार्गदर्शन असे उपक्रम होतील, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

शहरातील युवा उद्योजक व नव्याने उद्योग उभारणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देऊन उद्योग निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे, त्यांचे कौशल्य वृद्धीत वाढ करणे, शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखणे, 2030 पर्यंत पर्यावरण पूरक व राहण्यायोग्य शहर निर्माण करणे, यासाठी महापालिकेने शहर परिवर्तन कार्यालयामार्फत धोरण तयार केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पिंपरी-चिंचवड फेस्टिवल ऑफ द फ्युचर उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यामध्ये शहरातील विविध समस्यांवर नागरिकांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा समावेश करणे, उदयोन्मुख व स्टार्टअपना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मिळवून देणे, नागरिकांमधून उद्योजक घडावे, यासाठी मार्गदर्शन करणे आदींचा समावेश असेल. तसेच शहरातील 20 नावीन्यपूर्ण स्टार्टअप उद्योजकांच्या व्यावसायिक प्रकल्पांचे प्रदर्शनदेखील फेस्टिव्हलमध्ये असेल. त्यातून नवउद्योजकांना प्रेरणा मिळेल व शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात भर पडेल. नवोदित व नावीन्यपूर्ण उद्योजकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधीही यातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या उपक्रमामध्ये अंदाजे एक हजार स्टार्टअप उद्योजक सहभागी होण्याची शक्‍यता आहे. शहर परिसरातील विविध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कंपन्यांना ग्राहक, गुंतवणूकदार, भागीदार मिळविण्यात फेस्टिवल महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्‍वास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. 

महत्त्वाच्या बाबी :-  

- पीसीएमसी सिटीझन हॅकेथॉन : नागरिकांनी नावीन्यपूर्ण कल्पनांवर विचार करावा. शहर परिसरातील अडचणींवर नावीन्यपूर्ण उपाय सुचवावेत यासाठी हॅकेथॉन घेण्यात येईल. 
- पीसीएमसी स्टार्टअप पिचफेस्ट : योग्य 'स्टार्ट अप'च्या यशस्वितेसाठी व विस्तारासाठी गुंतवणूक, पीओसी, कॉर्पोरेट आणि सरकारपर्यंत पोचण्यास व्यासपीठ व मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देणे. 

- पीसीएमसी स्पीकर सिरीज : परिसरातील तरुणांना व्यावसायिक कौशल्य वृद्धीसाठी व्यावसायिक शिक्षण व माहिती देण्यासाठी देश-विदेशातील यशस्वी उद्योजकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन शिबिर होईल.
- पीसीएमसी स्टार्टअप शोकेस : परिसरातील 20 नावीन्यपूर्ण 'स्टार्टअप' प्रदर्शित करण्यात येतील. 

- पिंपरी-चिंचवड 'फेस्टिवल ऑफ फ्युचर'साठीचे अर्ज www.festivaloffuture.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

जगातील तेल अविव्ह, सिंगापूर, हॉंगकॉंग, बार्सिलोना आदी शहरात 'फेस्टिवल ऑफ फ्युचर' नियमितपणे आयोजित केले जातात. स्थानिक महापालिका त्यांना मदत करतात. यामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग असतो. त्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होते. यासाठी असे महोत्सव गरजेचे आहेत. यासाठी घोषवाक्‍य स्पर्धा घेतली जाईल. 'लोगो' तयार करण्याचे काम सुरू आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com