Video : 'सारथी'समोर पुन्हा आंदोलन; विद्यार्थ्यांसोबत 'तारादूत' मैदानात!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

राज्यातील महिला सबलीकरण आणि अन्य उपक्रमांसाठी काम करणाऱ्या अनेक तारादूत राज्यात कार्यरत आहेत.

पुणे : मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांनी आंदोलन करूनही छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेचा (सारथी) प्रश्‍न सुटलेला नाही. या संस्थेतून पाठ्यवृत्ती मिळणे बंद झालेले विद्यार्थी आणि महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या तारादूत यांनी मानधन मिळावे, यासाठी सोमवारी (ता.13) आंदोलन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्च्यातील नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी सारथीची स्वायत्तता काढल्याबद्दल आंदोलन केले होते. त्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वायत्तता पूर्ववत करण्याची घोषणा केली होती. त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही.

- Video : अखेर खडकीची 'ती' धोकादायक पाण्याची टाकी झाली जमीनदोस्त

त्यातच सोमवारी या संस्थेचे लाभार्थी विद्यार्थी आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती दिली जाते. परंतु दीडशे विद्यार्थ्यांना त्याची रक्कम मिळालेली नाही, ती तातडीने मिळावी, अशी त्यांची मागणी होती. 

- Video : पुण्यात झोमॅटोची सर्व्हिस कोलमडली; डिलिव्हरी बॉय पुन्हा संपावर

राज्यातील महिला सबलीकरण आणि अन्य उपक्रमांसाठी काम करणाऱ्या अनेक तारादूत राज्यात कार्यरत आहेत. त्यांना दरमहा अठरा हजार रुपये मानधन दिले जाते. गेला महिनाभर त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यांनीही आंदोलनात सहभागी होऊन तातडीने मानधनाची रक्कम मिळावी, अशी मागणी केली.

- तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students and women workers agitate again in front of the Sarthi organisation in Pune