स्वातंत्र्य दिनानिमित्त 'फियाट'प्रेमींची रॅली

Fiat Rally
Fiat Rally

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त फियाट कारप्रेमींनी रॅली काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला. फियाट क्‍लासिक कार क्‍लब ऑफ इंडियातर्फे (एफसीसीसीआय) शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयापासून ते आगाखान पॅलेसपर्यंत ही रॅली काढण्यात आली. यामध्ये 30 फियाटमधून 75 जण सहभागी झाले होते. 

एकामागे एक धावणाऱ्या फियाट बघून नागरिकांनीही या रॅलीला प्रतिसाद दिला. रॅली संपल्यानंतर आगाखान पॅलेस येथे गांधी स्मारक समितीचे विश्‍वस्त उमेशचंद्र सारंगी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कर्नल मारवा, कर्नल देशपांडे व कर्नल सतीशकुमार भाटिया, संजय ढेरे, सुभाष करमरकर, ऍड. धैर्यशील पाटील, हितेन जेराजानी, हेमचंद्र श्रोत्री, संदीप शिंगाडे या वेळी उपस्थित होते. 

फियाट क्‍लासिक कार क्‍लब ऑफ इंडियाची स्थापना 15 ऑगस्ट 2004 रोजी पुण्यात करण्यात आली आहे. या क्‍लबचे 60 सदस्य असून त्यामध्ये 1934 पासून ते 1996 पर्यंतच्या सुमारे 65 फियाट गाड्या आहेत. त्या आजदेखील रस्त्यांवर धावत आहेत. क्‍लबतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com