लोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असलेल्या देशातील विमानतळांच्या यादीत लोहगाव विमानतळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे. 

लोहगाव विमानतळावरून दररोज उड्डाण होणाऱ्या विमानांची संख्या गेल्यावर्षी १५८ होती, तर आता हे प्रमाण २०० वर पोचले आहे. विमानांच्या फेऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा पुणे विमानतळ सुमारे एक कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्‍यता लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी वर्तविली आहे. 

बंगळूर विमानतळाच्या प्रवाशांची संख्या २८ टक्‍क्‍यांनी, अहमदाबाद विमानतळाची २२.८ टक्‍क्‍यांनी, हैदराबाद विमानतळाची २१.९ टक्‍क्‍यांनी, तर चेन्नई विमानतळाच्या प्रवाशांची संख्या १४.७ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. पुणे विमानतळाची संख्या १४.६ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 

गेल्यावर्षीच्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या प्रवाशांच्या संख्येशी २०१७ मधील प्रवासी संख्येबरोबर तुलना करून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) हा निष्कर्ष काढला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये लोहगाव विमानतळावरून १९८, तर गेल्यावर्षी २०० आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे झाली आहेत, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे. 

Web Title: Fifth position in the world of Lohgaon Airport