सायकल वारीचं पाचवे वर्ष; आजपर्यंत जवळपास २३ हजार किलोमीटरचा प्रवास !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

सन २०१६ मध्ये कोल्हापूर,२०१७ सतारा,२०१८ ला पुणे,१०१९ औरंगाबाद या जिल्ह्यात गडभ्रमंती केली आहे. या वर्षी कोकण भागातील किल्ल्यावर जाणार आहेत. यासह मराठा क्रांती मोर्चामध्ये पाच हजार किलोमीटरची यात्र देखील त्यांनी केली केली, अष्टविनायक, बालाजी यासह इतर ठिकाणी बावीस ते तेवीस  हजार किलोमीटर सायकल प्रवास केला आहे.
 
गोखलेनगर(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र पाटील मागील पाच वर्षांपासून बारामती ते विविध गडकिल्ले सायकलवर सफर करतात. गडकिल्यांवर साफसफाई करणे, मुलांमध्ये प्रबोधन करणे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणे इत्यांदी कामे करतात.

सन २०१६ मध्ये कोल्हापूर,२०१७ सतारा,२०१८ ला पुणे,१०१९ औरंगाबाद या जिल्ह्यात गडभ्रमंती केली आहे. या वर्षी कोकण भागातील किल्ल्यावर जाणार आहेत. यासह मराठा क्रांती मोर्चामध्ये पाच हजार किलोमीटरची यात्र देखील त्यांनी केली केली, अष्टविनायक, बालाजी यासह इतर ठिकाणी बावीस ते तेवीस  हजार किलोमीटर सायकल प्रवास केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सायकल चालवून आरोग्य सुदृढ राहते त्यामुळे जास्त सायकल चालवतात.सायकलमुळे व्यायाम चांगला होतो, पोट वाढत नाही, शरीर सुदृढ राहते असे पाटील यांनी सांगितले.
 
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fifth year of Cycle Wari on the occasion of Sharad Pawar birthday