त्रेपन्न लाख रुपयांचे हेरॉइन जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पुणे - हेरॉइन अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पुणे-बंगळूर महामार्गावर एका हॉटेलजवळ मंगळवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून 53 लाख रुपये किमतीचे 420 ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत दीड कोटी रुपये इतकी असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.

विशाल पोपटभाई पटेल (वय 27, रा. ब्रह्मसिटी कॉम्प्लेक्‍स, नऱ्हे गाव, मूळ सूरत, गुजरात) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कात्रज ते सिंहगड रस्ता परिसरात एक जण अमली पदार्थांची विक्री करीत आहे. तो नवले पुलालगत डेक्कन पॅव्हेलियन हॉटेलजवळ हेरॉइन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार शैलेश जगताप यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलेश जगताप, कर्मचारी परवेज जमादार, संतोष पागार, राहुल घाडगे, प्रमोद गायकवाड, अजय भोसले, विनायक जोरकर, मल्लिकार्जुन स्वामी आणि धनाजी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास छापा टाकला. आरोपी विशाल पटेल याची झडती घेतली असता 420 ग्रॅम हेरॉइन आढळून आले. त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे शहरात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महामार्ग आणि काही बड्या हॉटेल्सवर पोलिसांकडून "वॉच' ठेवण्यात येणार आहे.

जादा पैशांसाठी विक्रीचा धंदा
आरोपी विशाल पटेल याचे टाइल्सचे दुकान होते. हा व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे जादा पैसा कमाविण्यासाठी अमली पदार्थ विक्री करण्याचा धंदा सुरू केला. तो मूळचा गुजरात येथील असून, येथे तो भाडेतत्त्वावर राहत होता. त्याचा अन्य एक साथीदार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांतील अमली पदार्थाच्या विरोधात ही मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Fifty-three million worth of heroin seized