दारू दुकानाविरोधात रहिवाशांचा लढा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

वडगाव शेरी  - गंगा आर्किडीया सोसायटीत प्रस्तावित दारू दुकान सुरू होऊ नये, यासाठी स्थानिक रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते. 

वडगाव शेरी  - गंगा आर्किडीया सोसायटीत प्रस्तावित दारू दुकान सुरू होऊ नये, यासाठी स्थानिक रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते. 

स्थानिक नगरसेवक, खराडी हौसिंग असोसिएशन, न्याती एम्पायर गृहरचना संस्था, बेगनगर येथील जामा मस्जिदचे ट्रस्टी आदी संस्था- संघटनांनी दारू दुकानाला विरोध केला आहे. याविषयी गंगा आर्किडीया सोसायटीचे पदाधिकारी किरण पलसे व नरउत्तम दास म्हणाले, ""आम्ही उत्पादन शुल्क मंत्र्यांना भेटून समस्या मांडली. त्यांनी दुकान सुरू होणार नाही, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी, आयुक्त, उत्पादन शुल्क अधिकारी, पोलिस निरीक्षकांना भेटलो. परंतु, सर्वांनी एकमेकांकडे बोट दाखवले. आमच्या सोसायटीचा परिसर शांत व चांगला आहे. परंतु, येथे दारू दुकान सुरू झाल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल.'' 

खराडीत यापूर्वी सुरू झालेल्या दारू दुकानांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तोच प्रकार येथेही सुरू होईल. त्यामुळे प्रशासनाने येथील दारू दुकानाला परवानगी देऊ नये. 
- नितीन मेमाणे,  अध्यक्ष, खराडी हौसिंग असोसिएशन 

Web Title: The fight of residents against liquor shops