लॉकडाउनच्या काळात मारमारी केली, पण पोलिसांनी असा शिकवला धडा...

राजकुमार थोरात  
Sunday, 3 May 2020

वालचंदनगर पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी येथे लॉकडाउनच्या काळामध्ये रस्त्याच्या कारणावरून दोन गटामध्ये कोयता, कुऱ्हाड, लोखंडी रॉडने मारामारी झाली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रात कोठे, काय सुरू आहे...

अभिजीत अनिल सपकळ (वय ३७, रा. हडपसर, मूळ रा. पकळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गितेश विठ्ठल पवार, सचिन प्रकाश पवार, नितीन प्रकाश पवार, प्रकाश साहेबराव पवार, विठ्ठल साहेबराव पवार, रेखा प्रकाश पवार, कल्पना विठ्ठल पवार (सर्व रा. सपकळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटातील, गितेश विठ्ठल पवार (वय २८, रा. सपकळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महेश तुकाराम सपकळ, शुभम महेश सपकळ, शिवराज नंदकिशोर सपकळ, अभिजीत अनिल सपकळ, रमेश गणपत सपकळ, संजय गणपत सपकळ, सत्यजीत भाऊसाहेब सपकळ, रोनित रमेश सपकळ, अर्चना महेश सपकळ, स्नेहा अनिल सपकळ (सर्व रा. सपकळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमुळे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही शुक्रवारी (ता. १) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सपकळवाडीमध्ये रस्त्याच्या कारणावरून कुऱ्हाड, कोयता व लोखंडी रॉडने दोन गटामध्ये मारामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी संचारबंदीचा आदेश असताना आणि कोरोना विषाणू संसंर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही सहकार्य न करता जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नियामांचे उल्लंघन करून गर्दी जमवून मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबतचा तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पालिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर बनकर व वसंत वाघोले करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting with ax and iron rod in two groups due to road dispute