महापालिकेत लसीकरण केंद्रावरून सध्या नळावराच्या भांडणासारखी भांडणे सुरू

नावात काय असते असं म्हणले जाते, पण नावातच सर्व काही असतं, त्याच नावासाठी महापालिकेत सध्या नळवराच्या भांडणासारखी भांडणे सुरू झाली आहेत.
Pune Municipal
Pune MunicipalSakal

पुणे - नावात काय असते असं म्हणले जाते, पण नावातच सर्व काही असतं, त्याच नावासाठी महापालिकेत (Municipal) सध्या नळावराच्या भांडणासारखी भांडणे (Fighting) सुरू झाली आहेत. मनासारखे केंद्र मिळावे यासाठी यादी दिली, ती मान्य ही झाली, आता मात्र त्याला प्रतिस्पर्धी नगरसेवकाला (Corporator) दिलेल्या केंद्रावर आक्षेप घेऊन वाद सुरू झाला आहे. ते केंद्र बदला साठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडूच दबाव येत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. (Fighting in Municipal by Vaccination Center)

कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले होते. यात पदाधिकाऱ्यांनी हातमिळवणी करून सर्वच नगरसेवकाच्या शिफारशीनुसार एक केंद्र सुरू करायचा निर्णय घेतला. त्यानुसार ८३ नवे केंद्र व प्रशासकीयदृष्ट्या सोईचे ७ व जुने ९१ असे एकूण १८१ केंद्र सुरू करण्यात आले.

Pune Municipal
आषाढी वारीचा निर्णय मुंबईत होणार : अजित पवार

लसीकरण केंद्रांचा आदेश काढल्यानंतर पक्षांतर्गत व विरोधीपक्षातील नगरसेवकाला मिळालेल्या केंद्रावरून वाद सुरू झाला आहे. यामध्ये बिबवेवाडी, ढोले पाटील व येरवडा, कोथरूड, सिंहगड रस्ता या क्षेत्रीय कार्यालयासह मध्यवर्ती पेठांतील नगरसेवकांचा समावेश आहे. मला या शाळेत केंद्र नको, त्या नगरसेवकाचे केंद्र मला द्या, त्याला खासगी दवाखान्यात कशी परवानगी दिली?, महापालिकेच्या दवाखान्यात केंद्र नको, त्यापेक्षा शाळा किंवा विरंगुळा केंद्रात द्या, बॅडमिंटन हॉलमध्ये परवानगी नको, तेथील मॅट खराब होईल, अशा तक्रारी अधिकाऱ्यांकडे केल्याने पुन्हा वाद सुरू झाले आहेत. बिबवेवाडी परिसरातील एका नगरसेविकेने दोन केंद्र हवे म्हणून हट्ट सुरू केला. शेवटी त्यांच्या गटनेत्यांनी समजूत काढल्यानंतर शांत झाल्या. दत्तवाडीतील गाडगीळ दवाखान्यातील केंद्र बंद करून एका शाळेत केंद्र सुरू केले आहे. एका नगरसेवकांनी मंदिरात लसीकरण केंद्र सुरू करून घेतले, तेथे पार्किंग, स्वच्छता गृह नसल्याच्या तक्रारी आल्याने वाद सुरू झाला आहे. नगरसेवकांच्या या वादात माजी महापौर, माजी सभागृहनेते, माजी स्थायी समिती अध्यक्षांसह काही विद्यमान पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

Pune Municipal
सर्वांना नियम सारखे! पुणे पोलिसांची KKR च्या खेळाडूवर कारवाई

म्हणून दवाखाना नको

महापालिकेच्या दवाखान्याला कुटुंबीयांचे नाव असले तरी त्यामुळे स्वतंत्र ओळख होणार नाही. त्यामुळे एका शाळेत केंद्राची माननियांनी मागणी केली. तसेच महापालिकेच्या दवाखान्यात कोणताही नगरसेवक येऊ शकतो, त्यामुळे अनेकांनी दवाखान्याऐवजी इतर ठिकाणची नावे सुचविली आहेत.

‘लसीकरण केंद्र नागरिकांच्या सोईसाठी आहेत, त्यामध्ये नगरसेवकांनी आपआपसात वाद घालू नयेत. तसेच या केंद्रांवर कोणत्याही नगरसेवकास पक्षाचे, स्वतःचे होर्डिंग लावता येणार नाहीत.’

- मुरलीधर मोहोळ, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com