esakal | राष्ट्रवादी, भाजपाच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी, भाजपाच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रवादी, भाजपाच्या नेत्यांची बदनामी, धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांची फेसबुकवर बदनामी करणाऱ्याविरुद्ध सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य राजकीय व्यक्तिचीही बदनामी केल्याचा प्रकार

राष्ट्रवादी, भाजपाच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यानावांचा वापर करण्यासह इतर महिलांबाबत फेसबुकवर बदनामीकारक छायाचित्र व मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एका व्यक्तिविरुद्ध पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांबाबत त्याने बदनामीकारक मजकुर प्रसारित केला आहे.

हेही वाचा: निवृत्त एसीपी असल्याचे खोटे सांगत शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार

राहुल मुळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ एप्रिल २०२१ पासून सुरु होता. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डि.एस. हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मुळे याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन मुंडे व शर्मा यांच्यासह अन्य महिलांबाबत फेसबुकवर सातत्याने वेगवेगळ्या अश्लिल भाषेमध्ये मजकूर टाकला होता. तसेच त्याच्या मजकुरावर प्रतिसाद देणाऱ्याबाबतही अश्लिल भाषेमध्ये उलट प्रतिसाद दिला होता. काही समाजातील लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल , अशा प्रकारचाही मजकूर टाकून चितावणीखोर भाष्य केले आहे. याबरोबरच त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, अनिल देशमुख, संजय राऊत, अमृता फडणवीस, अमोल मिटकरी, रोहित पवार यांच्याबद्दलही फेसबुकवर मजकुर प्रसारित केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

loading image
go to top