पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने

राजकुमार थोरात
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केली आहे.

वालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केली आहे.

बुधवारी (ता. २५) माने यांनी पवार कुंटूबाचे भेट घेतली. शनिवारी (ता.२१) अर्बन बॅंकेचे संचालक व शेतकरी वसंत पवार यांनी विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्यापूर्वी पवार यांनी दोन चिठ्ठा लिहून ठेवल्या होत्या.यामध्ये गेल्या दोन वर्षापासुन उन्हाळी हंगामाचे पाणी मिळत नसल्यामुळे पिके जळून जात असल्याने कर्जबाजारी होत असून  अात्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. यासंदर्भात माने यांनी सांगितले की, नीरा डाव्या कालव्याला पाणी येवून ४५ दिवस झाले आहेत. तरीही बेलवाडी,लासर्णुे परीसरातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही.

गतवर्षी ही अशीच परस्थिती होती.पाटबंधारे विभागच्या अधिकाऱ्यामुळे सात हजार एकरातील उस जळाला होता. यावर्षी ही शेतकऱ्यांची पिके जळू लागली होती. पवार यांनी पाण्यासाठी  १३ एप्रिल रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी १७ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे अाश्‍वासन दिले होते. अधिकाऱ्यांनी आश्‍वासन पाळल्यामुळे पवार यांनी  आत्महत्येचा निर्णय टोकाचा निर्णय  घेतला असण्याची शक्यता आहे.  पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी माने यांनी पवार कुंटूबाचे सांत्वन करुन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्‍वासन दिलेे.
 

Web Title: File a criminal case against the Irrigation Department said by pravin mane