पुणे : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोन बाऊंसरविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये दोन बाऊन्सरनी तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये दोन बाऊन्सरनी तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन दोन अनोळखी बाऊन्सरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तक्रारदार तरुणी व तिचा मित्र 26 जानेवारीला सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये गेले होते. तेथील पार्टीमध्ये नृत्य करताना पोट दुखल्याने तरुणी टेबलावर बसली होती. त्यावेळी तेथे आलेल्या बाऊन्सरने तिचा विनयभंग केला.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

तरुणीच्या मित्राने त्यांना विरोध केल्यानंतर दोघांनी तरुणास शिवीगाळ करीत त्यास मारहाण केली. तसेच दोघांना हॉटेलबाहेर काढण्यात आले. या प्रकरणी तरुणीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी साथ देत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचे रेकॉर्डींग करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. काही दिवसांनी हा सर्व प्रकार तरुणीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed case against two bouncers who molested a young girl

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: