बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी राजीव शिवनाथ सोनकर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वेदांत बिल्डकॉमचे भागीदार राहुल गोयल व आकाश गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकार २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये पिसोळी येथे घडला.

फिर्यादी सोनकर यांनी पिसोळी येथील त्यांची एक हेक्‍टर ३७ आर जमीन वेदांत बिल्डकॉमचे भागीदार राहुल गोयल, आकाश गोयल यांना विकसनासाठी दिली होती. त्यांच्यातील करारानुसार सोनकर यांना १२३ सदनिका द्यायच्या होत्या. मात्र, गोयल यांनी ७५ सदनिका दिल्या. त्यामुळे सोनकर यांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आम्ही फसविले नाही
संबंधित गृहप्रकल्प मे २०१८ मध्ये पूर्ण करायचा होता, तो आम्ही १६  फेब्रुवारी २०१८ रोजी मुदतीपूर्वीच पूर्ण केला. त्यानंतर सोनकर यांच्याकडे असलेले आमचे ‘रिफंडेबल सिक्‍युरिटी डिपॉझिट’ देऊन त्यांच्या ४८ सदनिका त्यांनी घ्याव्यात, असे आम्ही सांगितले. त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामध्ये आम्ही कुठे फसवणूक केली आहे. शेवटी हे प्रकरण न्यायालयात न्यावे लागले, असे वेदांत बिल्डकॉमचे मालक आकाश गोयल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com