पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे ः बनावट दस्तऐवज तयार करुन कोट्यावधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिध्दार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक युवराज संभाजी बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार बेलदरे (दोघेही रा. आंबेगाव बुद्रुक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डांगी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांचे चुलते हेमंत मिश्रीलाल डांगी व पिंकी हेमंत डांगी यांच्याकडून आंबेगाव बुद्रुक येथील मिळकत विकत घेतली होती. या व्यवहारासाठी सिद्धार्थ यांनी हेमंत डांगी यांना एक कोटी 39 लाख 15 हजार दिले होते. दरम्यान, बेलदरे बंधुंनी संबंधित मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करुन फिर्यादी हे बेलदरे यांना त्यांची मिळकत विक्री करत असल्याचा बनावट करारनामा तयार केला. याबाबत फिर्यादी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. पोलिसांकडून तक्रार अर्जासोबतच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी बेलदरे बंधुंनी बनावट कागदपत्रे तयार करुन मिळकत लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. याबाबत पोलिस उपायुक्तांनी बेलदरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

"नगरसेवक युवराज बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार बेलदरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन मिळकत लाटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बेलदरे यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -'' विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com