चुकीची औषधांमुळे रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी एका महिला डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

पुणे : चुकीचे औषधे दिल्याने 25 वर्षीय तरुणांची तब्येत बिघडल्यानंतर तातडीने उपचार न करता निष्काळजीपणा केल्यामुळे तरुणाच्या मृत्यू प्रकरणी एका महिला डॉक्‍टरविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

पुणे : चुकीचे औषधे दिल्याने 25 वर्षीय तरुणांची तब्येत बिघडल्यानंतर तातडीने उपचार न करता निष्काळजीपणा केल्यामुळे तरुणाच्या मृत्यू प्रकरणी एका महिला डॉक्‍टरविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाच ऑक्‍टोबर 2018 या दिवशी खडकीतील रेंजहल्सि ही घटना घडली होती, दरम्यान, ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 

आशिष राहुल आल्हाट (वय 25, रा. रेंजहिल्स, खडकी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मीना आल्हाट (वय 48, रा. रेंजहिल्स, खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डॉ.पुष्पा निरंजन जोशी (वय 68, रा. भोसलेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आल्हाट या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचा मुलगा आशिष यास पाच ऑक्‍टोबरला सकाळी झोपेतून उठल्यानंतर छातीत जळजळ होऊ लागल्याने त्यास जोशी क्‍लिनिकमध्ये नेण्यात आले. तेथील डॉ.पुष्पा जोशी यांनी आशिषची तपासणी करून मेडीकलमधून मागविलेले इंजेक्‍शन दिले. त्यानंतर त्याची तब्येत आणखीनच बिघडली. त्यानंतर त्यास कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारापूर्वीच आशिषचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

दरम्यान, आशिषवर करण्यात आलेल्या उपचारासंबंधीची सर्व कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल फिर्यादी यांनी ससूनच्या तज्ञ वैद्यकीय समितीकडे पाठविला होता. त्यानुसार, संबंधित समितीचा अहवाल खडकी पोलिसांना प्राप्त झाला. त्यामध्ये डॉ.जोशी यांनी रुग्णास दिलेल्या औषधांचा दुष्परिणाम झाल्याने त्याची तब्येत आणखी बिघडली. त्यानंतर रुग्णांवर तातडीने उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे फिर्यादी यांनी संबंधित डॉक्‍टरविरुद्ध त्यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा झाल्याबाबत गुन्हा दाखल केला. 
 

Web Title: Filing a complaint against a female doctor for the death of a patient due to wrong drugs