
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतील अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी (ता. ११) जाहीर झाली आहे. या अंतिम यादीत ११ लाख ३८ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित फेरीअंतर्गत प्रवेशासाठी कोणते महाविद्यालय मिळाले हे २६ जूनला जाहीर होणार आहे.